राहुस्तोत्रम्
अस्य श्रीराहुस्तोत्रस्य वामदेव ऋषिः । गायत्री छन्दः । राहुर्देवता ।
राहुप्रीत्यर्थं जपे विनियोगः ॥
राहुर्दानव मन्त्री च सिंहिकाचित्तनन्दनः ।
अर्धकायः सदाक्रोधी चन्द्रादित्यविमर्दनः ॥ १ ॥
रौद्रो रुद्रप्रियो दैत्यः स्वर्भानुर्भानुमीतिदः ।
ग्रहराजः सुधापायी राकातिथ्यभिलाषुकः ॥ २ ॥
कालदृष्टिः कालरुपः श्रीकष्ठह्रदयाश्रयः ।
विधुंतुदः सैंहिकेयो घोररुपो महाबलः ॥ ३ ॥
ग्रहपीडाकरो द्रंष्टी रक्तनेत्रो महोदरः ।
पञ्चविंशति नामानि स्मृत्वा राहुं सदा नरः ॥ ४ ॥
यः पठेन्महती पीडा तस्य नश्यति केवलम् ।
विरोग्यं पुत्रमतुलां श्रियं धान्यं पशूंस्तथा ॥ ५ ॥
ददाति राहुस्तस्मै यः पठते स्तोत्रमुत्तमम् ।
सततं पठते यस्तु जीवेद्वर्षशतं नरः ॥ ६ ॥ ॥
इति श्रीस्कन्दपुराणे राहुस्तोत्रं संपूर्णम् ॥
राहुस्तोत्रम् मराठी अर्थः
या राहु स्तोत्राचे वामदेव हे ऋषि आहेत. याचा गायत्री हा छंद आहे. या स्तोत्राची राहु ही देवता आहे. राहु प्रसन्न व्हावा म्हणून याचा जप करावा.
सिंहिकेचे चित्त आनंदित करणारा तीचा पुत्र, अर्धकायी, सदाक्रोधी, चंद्र आणि आदित्य यांचे विमर्दन करणारा, रौद्र, रुद्रप्रिय, दैत्य, स्वभानु, भानुमितिद, ग्रहराज, सुधापायी, राकातिथ्यभिलाषुक, कालदृष्टि, कालरुप, श्रीकष्ठह्रदयाश्रय, विधुंतुद, सैहिकेय, घोररुप, महाबल, ग्रहपीडाकर, द्रंष्टी, रक्तनेत्र, महोदर, या राहुच्या पंचविस नावांनी माणसाने राहुचे स्मरण करावे. असे स्मरण करणार्याची मोठी पीडासुद्धा नाहीशी होते. चांगले आरोग्य, पुत्र, अतुल संपत्ती, धान्य, पशु, आदि सर्व राहु हे स्तोत्र म्हणणारास देतो. हे स्तोत्र नेहमी म्हणणारास शंभर वर्ष आयुष्य लाभते.
अशाप्रकारे हे स्कन्दपुराणांतील राहुस्तोत्र संपूर्ण झाले.
[…] राहु स्तोत्र वाचावे. यासाठी कृपया येथे [ राहु […]