बळी हा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेत त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णूला साकडे घातले.

बळी हा वास्तविक भगवान प्रह्लादाचा नातू . त्याचे सात्विक संस्कार त्याच्यावर होतेच . वर त्याचे घराणे विष्णूभक्त . बळीने विष्णू कडे सदेह वैकुंठ प्राप्ती चा वर मागितला . बळी चे गुरु शुक्राचार्य हे मोठे आचार्य . त्यांच्या कृपे मुळेच संजीवनी मंत्राच्या सामर्थ्याने बळी ने बळी राजा ने देवलोकावर विजय मिळविला होता. परंतु कच देवामुळे संजीवनी मंत्र षटकर्णी झाला व त्याचा उपयोग संपला .

अजिंक्य होण्यासाठी बळी राजा ने शुक्राचार्यांच्या मार्गदर्शना खाली मोठा यज्ञ आरंभिला . यात याचक जे मागेल ते दान केल्याने बळी त्रैलोक्याचा स्वामी झाला असता. बलीची सात्विक वृत्ती लोप पावून असुर वृत्ती आरंभ होणार हे बळीच्या अनुयायांनी यज्ञ संपता संपता सुरु केलेल्या उठावामुळे लक्षात आले. राजा बळी लाही भक्ती सोडून सुप्त अहंकार मनात घर करू लागला . त्यामुळे बळीराजाचे पुण्य कमी झाले . अहंकार हा मोठ्या प्रमाणात पुण्य खातो हे या कथेवरून शहाण्यांनी लक्षात घ्यावे.

baliबळीला कसे आवरायचे म्हणून देव विष्णूकडे गेले.

विष्णू आपल्या भक्तांचे रक्षण करतो त्यामुळे विष्णूने देवांना बळी ला

शरण जावे असे सांगितले .

परंतु बळी चा त्रैलोक्याचा राजा होण्याच्या नादात वाढलेला अहंकार

आटोक्यात आणणे पण आवश्यक होते .

आता दोन्ही भक्तांचे भले करावे या हेतूने विष्णूने वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला.

बोलला. “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वामन उत्तरला.

शुक्राचार्यांना काय ते सर्व समजले. त्यांनी हे दान देवू नको आपण परत यज्ञ करू असे बळी ला सांगितले . यानंतर सर्व काय ते बळी उमजला.

आपल्या अहंकाराने आपला कसा घात केला ते बळी ला उमगले.

—————————————————————————————————————————

baliraja
त्याने त्रिपादभूमी देण्याचे मान्य करण्यासाठी पाणी सोडायला झारी उचलली

शुक्राचार्यांनी यात विविध अडथळे आणले .

याच प्रयत्नात त्यांना एक डोळा गमवावा लागला .

.
.
.
.
.

.
परंतू शब्द दिला तो बळीने पाळला. ‘दिली भूमी’ म्हणून म्हणाला. वामनाने एका पावलात स्वर्ग, दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली.
baliraja 3

तिसरे पाउल कुठे ठेऊ ?

असे विचारताच बळीने आपले मस्तक पुढे केले. यावर भगवान विष्णू प्रसन्न झाले
भगवान विष्णूनी  बळी ला दोन वर दिले.

१] बळी हा सप्त पाताळ लोकातील ‘सुतळ’ या भागाचा अभिषिक्त राजा झाला

२] बळी ला विष्णूने चिरंजीव केले

पण हे केल्याने सर्व पाप विष्णूला लागले . व ते फेडण्यासाठी भगवान विष्णू बळीच्या पाताळातील महालात द्वारपाल म्हणून गुप्तपणे राहू लागला.



2 Responses

Leave a Reply to Mandar Sant Cancel Reply

Your email address will not be published.